अडचण कधीच सांगून नाही येत. मोठ्या रकमेची गरज कधीही पडू शकते. अशा वेळेस आपण त्या रकमेसह तयार असणे गरजेचे असते, आणि अशा अचानक आलेल्या अडचणीवर मात करायला आर्थिक पाठिंबा देते "सोने तारण कर्ज" या योजनेमध्ये तुम्हाला १५ मिनिटांत सोन्यावर कर्ज मिळते आणि त्वरित आर्थिक अडचण दूर करता येते.
सोने तारण कर्ज म्हणजे तुमच्या सोन्याच्या दागिन्यांच्या मोबदल्यात मिळणारे सुरक्षित कर्ज. वैद्यकीय आपत्कालीन गरज, शिक्षणासाठी खर्च किंवा व्यवसायासाठी निधी अशा तातडीच्या आर्थिक गरजांसाठी हे कर्ज अतिशय उपयुक्त ठरते. अनेक संस्था १५ मिनिटांत कर्ज मंजुरी आणि झपाट्याने रक्कम वितरण करतात.
"Gold Loan Near Me" असं ऑनलाइन शोधा, किंवा जवळच्या विश्वसनीय सहकारी पतसंस्थेला भेट द्या. कमी व्याजदर, जलद प्रक्रिया आणि विश्वासार्ह सेवा देणाऱ्या स्थानिक कर्जदात्यांचा पर्याय निवडा.
१८ ते ७० वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक ज्याच्याकडे सोनं आहे, तो पात्र आहे. उत्पन्नाचा पुरावा किंवा क्रेडिट स्कोअरची आवश्यकता नसते. त्यामुळे गृहिणी, शेतकरी, स्वयंरोजगार करणारे यांच्यासाठी हे कर्ज योग्य आहे.
सोने तारण कर्जासाठी फक्त काही मूलभूत कागदपत्रांची गरज असते:
• आधार कार्ड / ओळखपत्र
• पत्त्याचा पुरावा (मतदार ओळखपत्र, वीज बिल इ.)
• पासपोर्ट साईज फोटो
उत्पन्नाचा पुरावा किंवा हमीदार लागत नाही.
तुमच्या सोन्याच्या वजन आणि शुद्धतेनुसार कर्ज रक्कम ठरते. बहुतांश संस्था सोन्याच्या बाजारमूल्याच्या ७५% पर्यंत कर्ज देतात. उदाहरणार्थ, ₹१,००,००० मूल्य असलेल्या सोन्यावर ₹७५,००० पर्यंत कर्ज मिळू शकते.
व्याजदर सहसा ७% ते १२% वार्षिक असतो, जो संस्था आणि कर्ज कालावधीवर अवलंबून असतो. तुमच्या जवळील कर्जदात्यांची तुलना करून सर्वोत्तम व्याजदर निवडा.
जर तुम्ही जवळच्या शाखेला आवश्यक कागदपत्रांसह भेट दिली, तर तुम्हाला १५ ते ३० मिनिटांत कर्ज रक्कम मिळू शकते. काही संस्था आधुनिक सोनं चाचणी यंत्र वापरून १५ मिनिटांत कर्ज देतात.
होय, तुमचं सोनं उच्च सुरक्षा असलेल्या लॉकरमध्ये विमा संरक्षणासह ठेवले जाते. कर्जाची संपूर्ण परतफेड केल्यानंतर ते जसेच्या तसे परत दिले जाते.
परतफेडीचे पर्याय लवचिक असतात — ३ महिन्यांपासून ३६ महिन्यांपर्यंत. काही संस्था एकरकमी (Bullet Repayment) किंवा मासिक हप्त्यांमध्ये (EMI) परतफेडीचा पर्याय देतात.
होय, बऱ्याच संस्था प्रीपेमेंट किंवा फोरक्लोजरची सुविधा देतात आणि त्यासाठी शून्य किंवा खूप कमी शुल्क आकारतात. वेळेआधी परतफेड केल्यास व्याजात बचत होते.
जर वेळेवर परतफेड केली नाही, तर तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो. अनेक नोटीसनंतर, संस्था तुमचं सोनं लिलाव करू शकते.
Reg. No: SAT/PLN/RSR/CR/617/2018-19/2018
पुष्प कॉम्प्लेक्स, ऑफीस नंबर २, रिंग रोड, फलटण- ४१५५२३
+९१ ८४५९२ २३३२७
महावीर स्तंभ गेट क्रमांक ३ समोर, फलटण- ४१५५२३
+९१ ९८६०७ २२५३०
बनकर डॉक्टर क्लिनीक शेजारी, साखरवाडी- ४१५५२२
+९१ ९८६०४ ४४५५७
नामजोशी उद्यान शेजारी, राजाळे- ४१५५२३
+९१ ९६७३१ ३५४५४
विशाल आर्केड, ऑफिस क्र. ३,४,५,६,चाफेकर चौक, चिंचवड- ४११०३३
+९१ ७०७०९ ७८१८१