नमस्कार,
मी गेल्या १५ वर्षांपासून के. बी. एक्सपोर्ट्स च्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांबरोबर काम करत आहे, मी स्वतःही एका छोट्या शेतकरी कुटुंबातून आलो असल्याने त्यांच्या समस्या खूप जवळून बघतोय आणि नेहमी हाच विचार मनात असतो कि ह्या बळीराजाला फक्त उत्पन्न मिळवून दिल्याने आपले कर्तव्य पूर्ण होत नाही आणि तो आर्थिक दृष्ट्या सक्षम होत नाही. त्याच्याकडे कितीही पैसे आले तरी तो ह्या आर्थिक चक्रव्यूहातून बाहेर पडू शकत नाही. शेतकऱ्यांच्या, नोकरदारांच्या आणि व्यावसायिकांच्याही समस्या सारख्याच. मिळालेल्या पैशाचे योग्य नियोजन न केल्याने वर्तमान तसेच भविष्यकाळही अनिश्चित होतो. यावर सखोल विचार केल्यानंतर सर्वसामान्यांच्या सर्वांगीण विकासाच्या हेतूने गॅलेक्सी को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. फलटण, या संस्थेची स्थापना करण्यात आली.

सहकाराला शिस्त आणि आधुनिक तंत्रज्ञानाची साथ मिळाली तर सर्वांगीण विकास सहज शक्य आहे. गॅलेक्सी या संस्थेमध्ये याचा सुरेख संगम सर्वांना अनुभवायला मिळतोय. त्याचीच पावती म्हणून दिवसेंदिवस गतिशील होत असलेल्या संस्थेच्या प्रगतीतून मिळतेय. येणाऱ्या काळात बँकिंग मध्ये नवनवीन मानदंड प्रस्थापित करून ग्राहकाभिमुख सेवा देण्याकरिता आम्ही सज्ज आहोत आणि तुम्हीही अशाच विश्वासाने व प्रेमाने साथ द्याल हीच अपेक्षा.

- सचिन यादव
संस्थापक चेअरमन, गॅलेक्सी को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.
डायरेक्टर, के.बी.एक्सपोर्टस

Galaxy Co-Operative Credit Society
Galaxy Co-Operative Credit Society
Top